मुंबई (प्रतिनिधी) : नारायण राणे यांच्यासारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असे ट्विट करून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे.

मंत्री राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.

मात्र या कार्यक्रमाआधीच खासदार विनायक राऊत यांनी दादादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणे यांना भेट देऊ देणार नाही, असे ट्विट केले आहे. आता यावरून राणे आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.