मुंबई (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला असून त्यांची नार्को टेस्ट करा अशी  मागणी देखील विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत:च्या सख्या भावाच्या घरासमोर चुलत भावाचे डोके फोडले. अत्यंत क्रूर पद्धतीने राणे यांनी चुलत भावाचा खून केला. त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी नारायण राणेंवर फक्त खुनाचा आरोपच केला नाही तर त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट करा म्हणजे अनेक खुनांना वाचा फुटेल, असा दावाही राऊत यांनी केला आहे.