नोव्हेंबरमधील ‘एमपीएससी’ परीक्षाही पुढे ढकला : विनायक मेटे

0
78

नाशिक (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘एमपीएससी’ची परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.

ते म्हणाले की, एक नोव्हेंबरला अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट ब’ची परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी एकूण ४ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. मात्र, नोव्हेंबरमध्ये होणारी या एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलाव्यात. याशिवाय आरक्षणामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत, अशा विद्यार्थ्यांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here