कुदनूर सरपंचांच्या पतीविरोधात ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा

0
123

चंदगड (प्रतिनिधी) : कुदनूर (ता.चंदगड) येथील सरपंच शालन कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे यांच्या गैरवर्तणुकीविरोधात मूकमोर्चा काढून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. शासकीय अधिकारी व गावातील युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून गावातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे कांबळे यांच्याविरोधात नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता.  

कांबळे यांनी आतापर्यंत अनेक खोटे गुन्हे व ॲट्रॉसिटीचे गुन्हे नोंद करून अनेक तरूणांचे जीवन असहाय्य केले आहे. त्यामुळे येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत हा मोर्चा काढून या सर्व प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. यावेळी बाबू मुतकेकर, राजू रेडेकर, सुखदेव शहापूरकर, नामदेव कोकीतकर, रामचंद्र बामणे, चंद्रकांत निर्मळकर, पी.बी.पाटील, नामदेव हेब्बाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.