बंगळुरु (वृत्तसंस्था) : देशातील ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीतील दिग्गज उद्योजक आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विक्रम किर्लोस्कर यांनी आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने टोयोटाला भारतात वेगळ्या उंचीवर पोहोचवले होते. बंगळुरु येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान राहीले आहे. आपल्या नेतृत्वाखाली त्यांनी टोयोटा कंपनीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवाले आहे. त्याच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे मंगळवारी निधन झाले. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे ते प्रमुख होते. विक्रम किर्लोस्कर यांनी मॅसाचुय्सेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून  मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. गेल्या काही वर्षात त्यांनी सीआयआय, एसआयएएम आणि एआरएआय मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम देखील केले होते. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एका सोहळ्यात ते उपस्थित होते.