मुंबई (प्रतिनिधी) : ‘अभिनेते विक्रम गोखले आणि माझे वडील मोहन गोखले हे दोघे भाऊ नव्हते विक्रम काकांच्या कुटुंबांचा व आमचा काहीही संबंध नाही. फक्त दोन कुटुंबामध्ये मैत्रीचे नाते आहे. इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विकिपीडियाचा वापर करत तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडत असाल तर ती तुमची चुकी आहे’ अशा शब्दात एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री सखी गोखले हिने नेटकऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

अभिनेते विक्रम गोखले हे एक उत्कृष्ट अभिनेता होते. लहानपणापासून त्यांचे काम व त्यांची पडद्यावरची जादू मी पाहिली आहे. त्यांचे जाणं ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे; पण विक्रम काका व माझे वडील (मोहन गोखले) हे भाऊ होते, हे साफ चुकीचे आहे. विक्रम गोखले यांच्या निधनावर एकही पोस्ट शेअर न केल्यामुळे सखी गोखलेला ट्रोलही करण्यात आले आहे. याला आता तिने जबरदस्त उत्तर देऊन नेटकऱ्यांच्या अज्ञानाची खिल्ली उडवली आहे.

त्यांचा (विक्रम गोखले) माझ्याशी काही संबंध आहे की नाही, मी त्यांच्याबाबत काही पोस्ट करायचे की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. विक्रम काका गेल्यानंतर त्यांच्याबाबत मी काहीच पोस्ट शेअर केली नाही. याबाबतचे असंख्य संदेश मला आले आहेत. शिवाय काहींनी माझ्यावर राग व्यक्त केला आहे. माझ राग करण्याआधी यामागे खरे कारण काय आहे, हे शोधा. माझ्याशी विनम्र वागण्यात तुम्ही जेवढा वेळ घालवलात त्या वेळेचा तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी वापर करा. जेणेकरून तुमच्या कुटुंबीयांना व मित्रांना तुमची लाज वाटणार नाही,’असे सईने सत्य सांगत ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.