विधानसभा अध्यक्षपदी विखे-पाटील?

0
39

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्यात आले असून, राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज (शुक्रवारी) संध्याकाळी पाच वाजता बैठक देखील होणार आहे. या बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तापालट झाले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अशातच दोन्हींकडून म्हणजेच शिंदे गटातून आणि भाजपकडून देखील विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

राधाकृष्ण पाटील हे ज्येष्ठ नेते असून, ते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे सर्वपक्षीय त्यांचे संबंध चांगले आहेत. त्याचबरोबर विधिमंडळ कामकाजाचा देखील त्यांना चांगला अनुभव आहे. या पदासाठी तीन ते चार नाव सध्या चर्चेत असली तरी त्यामध्ये विखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत.