‘डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने’च्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विजय पोवार, तर उत्तम पाटील कोषाध्यक्ष…

0
242

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी राज्य पातळीवरील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेची कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी ‘लाईव्ह मराठी’चे वरिष्ठ प्रतिनिधी विजय पोवार, उपाध्यक्षपदी ताज मुल्लाणी यांची तर कोषाध्यक्षपदी ‘लाईव्ह मराठी’चे शहर प्रतिनिधी उत्तम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह पदाधिकार्‍यांच्या निवडीची पत्रे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मोरे यांनी प्रदान केली.

जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -:
कोल्हापूर शहराध्यक्ष – प्रशांत चुयेकर, कोल्हापूर शहर सचिव – मदन अहिरे, सहसचिव – समाधान म्हातुगडे,  सदस्य – अस्लम शानेदिवाण, अनुराधा सरनाईक-कदम, चेतन शेरेगार, साक्षी दळवी.