घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलन

0
26

कुंभोज (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे गेली दोन वर्षे कोरोना काळात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले. तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

काही ग्रामपंचायतींनी घरकुलाचे प्रस्ताव पोहोच न केल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत. प्रामुख्याने पट्टणकोडोलीमध्ये हा प्रकार निदर्शनास आला आहे. येथून पुढे तालुक्यातील कोणत्याही गावांमध्ये लाभार्थी घरकुल विना वंचित राहू नये, अशी कार्यवाही करावी. एक महिन्याच्या आत याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. हातकणंगले गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांना तालुका आरपीआयच्या वतीने उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी निवेदन दिले.

यावेळी पट्टणकोडोली शहराध्यक्ष सुमित येळवणे, सागर कांबळे, बाळासाहेब कांबळे, रोहित चोपडे, सनी मधाळे, रोहित चोपडे, राहुल मधाळे, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.