शिवसैनिकांच्या पाठबळामुळेच पदवीधर निवडणुकीत विजय : आ. अरुण लाड

0
160

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरुण लाड यांनी शिवसेना शहर कार्यालयाला आज (सोमवार) सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना आमदार अरुण लाड म्हणाले की, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दिलेल्या पाठबळामुळे आपला पदवीधर निवडणुकीत विजय झाला आहे. सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील.

याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, अरविंद मेढे, उदय भोसले, सुनील जाधव, अमित चव्हाण, सुनील खोत, रणजीत जाधव, अजित गायकवाड, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत, विभागप्रमुख सुनील भोसले, अश्विन शेळके, मंदार तपकिरे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ शिवसैनिक दीपक गौड यांनी  आभार मानले.