चंदगड (प्रतिनिधी) : पदार्थविज्ञान आणि नॅनो टेक्नॉलॉजीमधील संशोधनामुळे जागतिक पातळीवर नावाजलेल्या प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी निवड करण्यात आली. यावेळी चंदगड तालुक्यातील दुंडगे या त्यांच्या जन्मगावी आज (मंगळवार) साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

डॉ. पाटील हे सध्या विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागप्रमुख आहेत. विद्यापीठात नॅनो टेक्नॉलॉजी विभागाची सुरुवात करण्यात त्यांचा पुढाकार होता. मटेरियल सायन्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन आहे. अधिष्ठातापदासह त्यांनी व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेवरही काम केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच राजू पाटील, उपसरपंच, सदस्य,विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.