पुणे : ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन पुणे येथे निधन झाले असून ते ८९ वर्षांचे होते. गाणारे व्हॉयलिन कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॉयलिन वादनाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली होती. जोग यांच्या व्हायोलिनच्या सुरांनी प्रसिद्ध गीतरामायणालादेखील समृद्ध केले. व्हायोलिनवादनाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ६ दशकं संगितक्षेत्राची सेवा केली. त्यांना २०१७ साली गदिमा पुरस्कार, २०१५ साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.