मुंबई (प्रतिनिधी) :  बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मीनू मुमताज यांचे आज (शनिवार) कॅनडामध्ये निधन झाले. मुमताज  यांचे भाऊ अनवर अली यांनी ही माहिती दिली आहे. मीनू मुमताज या दिग्गज विनोदवीर मेहमूद यांच्या बहिण आहेत. मुमताज यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केल्या आहेत.

१९५० ते १९६० च्या दशकात त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. मुमताज फक्त एक अभिनेत्री नव्हत्या तर त्या प्रसिद्ध डान्सर देखील होत्या. मीनू यांनी त्यांच्या करियरची सुरूवात एक डान्सर म्हणून केली. त्यानंतर ५० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून भूमिका बजावली. ‘सखी हातीम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्या बलराज साहनीसोबत मुख्य भूमिकेत होत्या.

मीनू मुमताज प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलाकार गुरुदत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कागज का  फूल’, ‘चौदवीं का चांद’, ‘साहिब बीवी और गुलाम’, ‘ताजमहल’, ‘घूंघट’, ‘इंसान जाग उठा’, ‘घर बसाके देखो’, ‘गजल’  यांरख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला होता.