मुंबई (प्रतिनिधी) : दिग्गज अभिनेत्री झरना दास (वय ७७) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कलासृष्टीत शोककळा पसरली आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री झरना दास यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांनी ओडिया चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल राज्य सरकारने त्यांना जयदेव पुरस्काराने गौरवले होते. १९४५ मध्ये जन्मलेल्या झरना दास यांनी ६० च्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. जगन्नाथ,  नारी, आदिनामेघा, हिसबनिकस, पूजाफुला, अमदबता, मालाजन्हा आणि हीरा नेला यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.