ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनकच

0
22

पुणे (प्रतिनिधी) : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आता त्यांची तब्येत खालावल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर त्यांच्या मुलीने या अफवाचे खंडन केले आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांबाबात देखील राजेश दामलेंनी सांगितले की, ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत डॉक्टर माहिती देत नाहीत, तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा.’

विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्या प्रकृतीबाबात सांगितले की  ‘विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून, ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत म्हणाल्या,’ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही प्रतिसाद दिलेला नाही.’