हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील क॥ आळते येथील श्री क्षेत्र रामलिंग व परिसरात पर्यटनास आलेल्या पर्यटकांवर हातकणंगले पोलिसांनी कारवाई करून त्यांची २४ वाहने जप्त केली. जिल्ह्यात शनिवार व  रविवार कडक विकेंड लाॅकडाऊन असताना देखील आळते परिसरात पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करून मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

त्यानुसार आज हातकणंगले पोलिसांकडून अतिउत्साही आणि नियमांचे उल्लंघन करत असलेल्या पर्यटकांवर कारवाई करून ७ चारचाकी वाहने व १७ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई हातकणंगले ठाण्याचे पोलीस अधीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काॅ. अतुल निकम, भूषण शेटे, सागर पोवार, संग्राम पाटील यांनी केली.