महापालिकेतर्फे वीरमाता, वीरपिता, वीरपत्नींंचा सत्कार

0
130

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नींंचा महापालिकेतर्फे वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते आज (मंगळवार) कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या सर्वांचा शाल, साडीचोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये खालील वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा समावेश आहे. कंसामध्ये शहिदांची नावे आहेत.
श्रीमती ऊर्मिला मरळे (निवृत्ती मरळे), सुलोचना रावराणे (लक्ष्मण रावराणे), श्रीमती कांचनदेवी भोसले (जयसिंग भोसले), सौ.माणिक वालकर (कॅप्टन शंकर वालकर), श्रीमती सुनीता देसाई (मेजर मच्छिंद्र देसाई), श्रीमती आनंदी उलपे (दिगंबर उलपे), श्रीमती मनिषा सूर्यवंशी (अभिजीत सूर्यवंशी), व्यंकोजी शिंदे (मेजर सत्यजित शिंदे), अनिल चिले (सुनील चिले), श्रीमती जाई जाधव (भगवान जाधव), श्रीमती अंजनी पाटील (श्रीकांत पाटील).

या वेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, नगरसचिव सुनिल बिद्रे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.