कुरुंदवाड (प्रतिनिधी) : पती-पत्नीचे नाते जन्मोजन्मी अखंड राहावे, अशी प्रार्थना करत शहरातील महिलांनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साही वातावरणात साजरी केली. शहरासह परिसरात असणाऱ्या गावागावात वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

महिलांनी विधिवत पूजा करून वडाच्या झाडाला धाग्याचे सात फेरे बांधून तेथे आलेल्या महिलांना वाण दिले गेले. काही महिलांनी घरातच वडाची फांदी आणून पूजा केली. गिरीष सिनेमा चित्रमंदिर परिसर, दत्त महाविद्यालय, दत्तमंदिर चिलखी भाग, सन्मित्र चौक, गोठणपूर भाग, भैरवाडी, ब्राह्मणपुरी, काळाराम मंदिर, नवबाग रोड, गणपती मंदिर या भागांतील महिलांनी सकाळी नऊ वाजल्यापासून वडाच्या झाडाच्या पारावर पूजेसाठी गर्दी केली होती. लक्ष्मी तंबूजवळ वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी प्रज्ञा सुतार, सुवर्णा सुतार, शकुंतला जुगळे, मंगल रजपूत, नूतन नलवडे, उमा कोरवी, आभा सूर्यवंशी, ज्योती कोरवी, कल्पना गायकवाड, सीमा भांगरे, अश्विनी गायकवाड आदी महिलांनी मोठी गर्दी केली होती.