कुंभोज मंगोबा देवालयाचा वास्तुशांती व कलशारोहण समारंभ

0
124

कुंभोज (प्रतिनिधी) : कुंभोज ता. हातकणंगले येथील श्री हिवरखान बिरदेव मंदिरमध्ये श्री मंगोबा मंदिर देवालयाच्या कलशारोहण व वास्तूशांती समारंभ अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हिवरखान बिरदेव मंदिरातून मंगोबा मंदिर देवालयाच्या शिखराच्या कलशाची धनगरी ढोलाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व धनगर समाजातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तसेच धनगर समाजाच्या वतीने महाप्रसादाचे करण्यात आले होते. धार्मिक विधी पुजा परंपरेनुसार वास्तुशांती व कलशारोहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी धनगर समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. राजकीय सामाजिक, शैक्षणिक,क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.