कुंभारवाडी येथील ज्योतिर्लिंग देवालयाचा वास्तुशांत, कलशारोहण समारंभ उत्साहात

0
245

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मौजे कुंभारवाडी (ता. पन्हाळा) येथील श्री ज्योतिर्लिंग देवालयाच्या नूतन इमारतीचा वास्तुशांत व कलशारोहण सोहळा आज (शुक्रवार) उत्साहात पार पडला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मंदिरासाठी आमदार फंडातून १५ लाख रुपये दिले. त्यांनी दिलेल्या निधीतून आणि लोकवर्गणीतून मंदिराची देखणी दुमजली नूतन इमारत बांधण्यात आली आहे.

या वेळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट देऊन श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सैतवडे येथील हुंबर नाथ महाराज यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. या वेळी महाप्रसादाचेही आयोजन केले होते. सरपंच महेश साळोखे, उपसरपंच रोहिणी करले, मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष संजय शिंदे, सचिव आनंदा कुंभार, विश्वनाथ डवरी, ग्रामपंचायत आणि बांधकाम समितीचे सदस्य, ‘लाईव्ह मराठी’चे निवासी संपादक सरदार करले, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.