‘एसपीएल’ क्रिकेट स्पर्धेत ‘वरद स्पोर्ट्स’ने पटकावले विजेतेपद

0
149

कोतोली (प्रतिनिधी) : येथील सिद्धिविनायक स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एसपीएल नाईट फुल पीच क्रिकेट लीग स्पर्धेत डॉ. प्रवीण घुगरे यांच्या वरद स्पोर्ट्स संघाने विजेतेपद तर अरुण तेली यांच्या ए. टी. स्पोर्ट्स संघाने उपविजेतेपद पटकावले.

नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. कोतोलीचे सरपंच पी. एम. पाटील, ग्रा. पं. सदस्य सज्जन पाटील तसेच सरदार पाटील व राजेंद्र तावडे यांच्या हस्ते विजयी संघास बक्षीस व चषक देण्यात आला. या स्पर्धेत एकूण सात संघांनी भाग घेतला होता.