कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर मराठा कमांडो सेक्युरिटी, इंटेलिजन्स आणि मॅनपॉवर फोर्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कमांडो अधिकारी वैभव पाटील यांची डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली आहे. ‘मिलिटरी सायन्स’ या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी दिल्ली येथील वर्ल्ड ह्युमन राईट प्रोटेक्शन कमिशनकडून त्यांची निवड झाली आहे.

ही पदवी त्यांना ६ जून २०२१ रोजी पितामपूर दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. वैभव मूळचे तिरपण (ता.पन्हाळा) गावचे रहिवासी आहेत. त्यांना आई सविता, वडील भैरू, पत्नी पूनम पाटील, मामा संदीप लाड, पांडुरंग लाड, बहीण संगीता पाटील, भाऊ प्रसाद पोवार यांचे प्रोत्साहन मिळाले. तर मराठा कमांडो फोर्सच्या स्टाफमधील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.