‘गौण खनिज’मधील मुजोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा : वडार समाजाची मागणी (व्हिडिओ)

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला गाढवांसह डंपर मोर्चा

0
446

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गौण खनिज यंत्रणेकडून वेठीस धरण्याच्या धोरणाविरुद्ध  ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या वतीने आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव व डंपर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये दगड खाणमालक, स्टोन क्रेशर मालक, डंपर मालक व सर्व खाण व क्रशर कामगार सहभागी झाले होते. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सुमारे सत्तर डंपरधारक सहभागी झाले होते.

 

विविध मागण्यांकडे  लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी अकराच्या सुमारास गंगाराम नगर, टोप येथून या मोर्चाला सुरुवात झाली. शिरोली एमआयडीसी, तावडे हॉटेल, कावळा नाका मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गौण खनिज यंत्रणेमधील मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, गौण खनिज परवाने त्वरीत दिली पाहिजे, गौण खनिज परवान्यांची मुदत १ वर्ष करावी, ऑनलाईन रॉयल्टी चलन भरणेस परवाणगी द्यावी, गौण खनिज वाहतूक वाहनावरील, मशिनवरील दंडाची कार्यवाही रद्द करावी, वडार समाजास पारंपारीक व्यवसायासाठी शासकीय जमीन त्वरीत उपल्बध करून देऊन परवाने मिळावेत, गौण खनिज यंत्रणेमधील मुजोर अधिकारी यांचेवर कारवाई करावी, गौण खनिज परवाने त्वरित दिली पाहिजे, गौण खनिज परवान्याची मुदत १ वर्ष करावी, ऑनलाईन रॉयल्टी चलन भरणेस परवाणगी मिळावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.