कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (बुधवार) ४५ वर्षावरील २,१९९ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस १,५७७ आणि दुसरा डोस ६२२ नागरीकांना देण्यात आला. महापालिकेच्यावतीने आज अखेर १,४१,८८३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर उद्या (गुरुवार) १८ वर्षावरील वयोगटातील नागरीकांना कोविशिल्डचा डोस देण्यात येणार आहे.

तसेच उद्या सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डच्या पहिल्या डोसकरीता महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात आणि कदमवाडी येथील द्वारकानाथ कपूर दवाखान्यामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या नागरीकांनी ऑनलाईन बुकिंग केले आहे अशाच नागरीकांचे उद्या  नागरीकांचे कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.

तसेच विक्रमनगर येथील भगवान महावीर दवाखाना येथे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत अशा नागरीकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.