कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्यातून महापालिकेचे माजी स्थायी सभापती सचिन चव्हाण यांनी आपले आरोग्य माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत प्रभाग क्रमांक ४६ सिद्धाळा गार्डन प्रभागात आज (बुधवार) लसीकरण मोहिमेचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली.

या लसीकरण शिबीरात ४५ वर्षावरील नागरिकांना कोव्हिडशिल्ड लसीचा पहिला तर ८४ दिवस झालेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. या लसीकरण शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक रावसाहेब कुऱ्हाडे, शिवाजी चव्हाण, तात्या शिंदे, रामदास भक्ते यांच्या हस्ते करण्यात आले. तर अरुण तोडणकर, बबन डाकवे, गिरीष शिंदे, मंगेश डाकवे, सुनील मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये प्रभागातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेत २२५ नागरिकांचे लसीकरण पार पडले.

यावेळी ओम सोमेश्वरी तरुण मंडळ, बजापराव माने तरुण मंडळ, सागर चव्हाण युवा मंच, सिद्धीविनायक मित्र मंडळ, सणगर गल्ली तालीम मंडळ, सणगर गल्ली चाणक्य तरुण मंडळ, बिंधास्त तरुण मंडळ, जरगगल्ली तरुण मंडळ, पावडर ग्रुप, नंगीवाली तरुण मंडळ, जय शिवराय तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक, महिला उपस्थित होत्या.