उत्तरेश्वर पेठ भाजप मंडलच्या वतीने दिव्यांगास तीन चाकी सायकल प्रदान

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लक्षतीर्थ वसाहत येथील दिव्यांग कॅलेंडर विक्रेता किरण शेटके यास उत्तरेश्वर पेठ भाजप मंडलच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली.

किरण शेटके महालक्ष्मी मंदिर परिसरात कॅलेंडर विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करतो. ही बाब लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावतीने किरण शेटके यास आज (गुरूवार) लक्षतीर्थ संयुक्त तरुण मंडळ चौक येथे भाजप संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या उपस्थितीत तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली.

उत्तरेश्वर पेठ भाजप मंडल अध्यक्ष भरत काळे यांनी प्रास्ताविक केले. संघटन सरचिटणीस अशोक देसाई, इकबाल हकीम, भाजप उपाध्यक्ष राजू मोरे, विजय आगरवाल, दिग्विजय कालेकर, नजीर देसाई, प्रसाद मोहिते, सुमित पारखे, प्रतीराज नीकम, सतीश जाधव, बाळू चौगुले, समीर अत्तार, योगेश तेली, पैमिदा मुल्ला, तबस्सुम हकीम आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.