नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आपला राजीनामा आज (मंगळवार) दिला. उत्तराखंडचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.

मुख्यमंत्री रावत यांनी सोमवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीअगोदर त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर नड्डांसोबत त्याची जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे रावत यांनी उत्तर दिले नाही व ते दिल्लीकडे रवाना झाले होते. मुख्यमंत्री रावत आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात बैठक झाल्यानंतर भाजप उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम   देहरादूनला दाखल झाले होते. राज्याच्या कोअर कमिटीतील नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. यानंतर या दोघांनी आपला अहवाल भाजप अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता.