सावरवाडी ( प्रतिनिधी ) : यंदाच्या खरीप हंगामात रोहिणी नत्रक्षाचा पेरा घेतलेल्या भात पीकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महे येथील शेतकरी भात कापणी व मळणीसाठी मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.

नव्या बदलत्या तंत्रज्ञानाचा भात कापणी मळणीसाठी उपयोग होऊ लागला. भात कापण्याची कामे लवकर पूर्ण व्हावीत म्हणून महे येथे मशिनच्या साहह्याने भात कापणी व मळणी करत आहेत. त्यामुळे मशिनद्वारे भात कापणी व मळणीची कामे उरखण्यात बळीराजाची धांदल उडू लागली आहे.