प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर : शहरातील पाच दुकानांवर कारवाईचा बडगा

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लॅस्टिक पिशव्या बंदी आदेशानुसार आज  महानगरपालिकेच्या पथकांनी शहरातील विविध पाच दुकानावर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केल्याबददल प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महापालिकेच्या पथकांनी प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक केलेल्या कारवाईत सत्यम टेडर्स, अजय टेडर्स, साहिल मटण शॉप, क्वॉलिटी फूड आणि साने गुरुजीनगरमधील एका किराणा दुकानावर कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार रुपयाप्रमाणे २५ हजाराचा दंड वसूल केला.

ही कारवाई विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर व निखिल पाडळकर यांनी केली आहे. तर साने गुरुजीनगरमधील एका किराणा दुकानावर आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार आणि मुकादम दाभाडे यांनी दंडाची कारवाई केली.

प्लॅस्टिक व थर्माकॉल प्रतिबंधक नियम २०१८ प्लॅस्टिक व थर्माकॉल प्रतिबंधक नियम २०१८ नुसार प्लॅस्टिक व थर्माकॉलचा वापर केल्याचे निर्दशनास आल्यास प्लॅस्टिक साठा जप्त करण्याबरोबरच प्रथम दंड ५ हजार रुपये, द्वितीय दंड १० हजार रुपये आणि तृतीय दंड २५ हजार रुपये आणि तीन वर्षाचा कारावास होऊ शकतो.