गडहिंग्लमधील पीर दस्तगीर बाबा यांचा उरूस रद्द..

0
280

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लजमधील कचेरी रोड परिसरातील हजरत पिराणे पीर दस्तगीर मेहबूब सुबहानी बाबा दर्गा यांचा उरूस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी लहान मुलांसाठी खेळणी,पाळणे,विविध प्रकारच्या वस्तू येथे विक्रीसाठी येतात. परंतु, कोरोनामुळे हा उरूस यंदा रद्द करण्यात आला आहे.

दि. २७ ते २९ जानेवारीला केवळ दस्तगीर बाबा यांच्या दर्ग्यातील केवळ ट्रस्टी आणि मानकरी यांच्या मोजक्याच उपस्थितीत धार्मिक विधी केले जाणार आहेत. असे दर्गा कमिटीकडून सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी देखील दर्ग्यात न येता आपल्या घरातूनच नैवद्य दाखवण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध निर्बंध आल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.