शिरोळ (प्रतिनिधी) : यड्राव येथे वली हजरत गजबरसो, राजे भक्षर सो व जंगली बाबा उरूस पहिल्यांदाच साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. फक्त नैवेद्य, नारळ व गलेफ घालणे या स्वरूपात हा उरूस साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस स्टेशन व उरूस कमिटीची ग्रामपंचायत येथे उरुसासाठी नियोजन बैठक घेतली होती. यावेळी उरूस कमिटी व पोलीस यांची साध्या पद्धतीने उरूस साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य केले. कोरोना रोगाचा पादुर्भाव लक्षात घेता दर्ग्या बाहेर आरोग्याकेंद्राच्या वतीने आशा स्वयंसेविका यांच्या मदतीने नागरिकांची मीटर च्या साह्याने चाचणी करण्यात येत होती, अशी माहिती उरूस कमिटी अध्यक्ष राहुल दावाडे यांनी दिली. सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उरूस कमिटी व पोलीस पाटील जगदीश संकपाळ, नेमिनाथ पाटील, बंडू उपाध्ये यांनी चोख नियोजन केले.