यड्राव येथील उरूस रद्द

0
373

शिरोळ (प्रतिनिधी) : यड्राव (ता.शिरोळ) येथील वली हजरत गजबरसो, राजभक्षेर सो व जंगली बाबा पीर यांचा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

उरूसानिमित्त २३, २४ आणि २५ मार्चरोजी करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. पण कोरोना रोगाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे हा उरूस व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय उरूस कमिटीने घेतला आहे. केवळ २५ मार्चरोजी गलीफ घालणे व गंधरात्र हा पारंपरिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.