मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला.

पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे.