नगर विकासमंत्री एकनाथ शिंदेना कोरोनाची लागण…

0
45

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here