पडळ येथे जिल्हा सांप्रदायिक वारकरी मंडळाच्या नामफलकाचे अनावरण

0
91

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पडळ (ता.पन्हाळा)  येथील दऱ्यातील भैरवनाथ मंदिरासमोर संस्थेच्या नूतन जागेवर श्री गुरु ह.भ.प. तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर प्रणित कोल्हापूर जिल्हा सांप्रदायिक वारकरी मंडळाच्या नामफलकाचे अनावरण गुरुवर्य ह.भ.प.विठ्ठलराव वास्कर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंडित कांबळे होते.

दरम्यान संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी उत्साहात पार पडली. या सभेत वारकरी मंडळाच्या नूतन इमारत उभारणीसाठी निधी संकलित करण्यासह विविध ठराव मंजूर करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अविनाश जठार, उपाध्यक्ष श्रीहरी पाटील,  सचिव शहाजी पाटील, खजानिस सुकुमार कोळेकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा सांप्रदायिक वारकरी मंडळाचे पदाधिकारी,  सभासद, जिल्ह्यातील वारकरी उपस्थित होते.