Published November 20, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी): ‘स्कॉलरपॉईट फाईव्ह’ या शैक्षणिक ॲपचे अनावरण जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत करण्यात आले. हे अॅप पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथल्या मानेवाडी विद्या मंदिरातील शिक्षक विजय एकशिंगे यांनी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक ॲपची ‍निर्मिती केली आहे.

या ॲपमध्ये मराठी, गणित, बुध्दिमत्ता आणि इंग्रजी या विषयांवर आधारित पाच हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्नांचा सराव, दोनशेपेक्षा जास्त घटकनिहाय ॲनिमेटेड व्हिडिओ, सरावासाठी पीडीएफ प्रश्नपत्रिका डाऊनलोड करुन घेण्याची सोय, घटकनिहाय साप्ताहिक चाचणी तसेच प्रश्न सोडवल्यानंतर लगेच उत्तर तपासण्याची सोय करण्यात आली आहे.

यावेळी अमन मित्तल म्हणाले, ‍कोल्हापूरसह आणि महाराष्ट्रातील  पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे ॲप पोहचविले जाईल. जिल्हयातील तंत्रस्नेही शिक्षकांना एकत्र करुन पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विदयार्थ्यांना अशा प्रकारचे मोफत ॲप तयार करण्याचा प्रयत्न  केला जाईल. ‘स्कॉलरपॉईट फाईव्ह’ या मोबाईल ॲपमुळे विदयार्थ्याना संबोध समजणे सहज शक्य होईल.

यावेळी गटशिक्षणाधिकारी बी.एम.कासार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन उकिर्डे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, विस्तार अधिकारी डी.सी. कुंभार, विस्तार अधिकारी विलास पाटील, विस्तार अधिकारी डी.ए.पाटील, विस्तार अधिकारी आर.वाय.पाटील, यांच्यासह क्रिएटिव्ह टिचर फोरमचे शिक्षक व जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023