देवस्थान समितीचा लोगो असलेल्या पोस्ट तिकिटाचे अनावरण

0
243

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा लोगो असलेले पोस्टाचे तिकिट व कापडी पिशवीचे अनावरण देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोष्टाची ‘माय स्टॅंप’ या संकल्पनेअंतर्गत देवस्थान समितीचे अध्यक्ष, सदस्य, सचिव यांचे स्टँप यावेळी देण्यात आले. १० हजार कापडी पिशव्यावर देवस्थान समितीचा लोगो व पोस्टाचा ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ असे प्रिंट करण्यात आले आहे. तसेच या पिशवीतून भाविकांना प्रसाद वितरीत केला जाणार आहे.

महेश जाधव म्हणाले की, पोस्टाच्या माध्यमातून आई महालक्ष्मी अंबाबाई भाविकांच्या घराघरात पोहोचेल तसेच तिकिटाच्या माध्यमातून देशविदेशात ही जाईल, यात तीळमात्र शंका नाही.

यावेळी पोस्टाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील, सहाय्यक अधीक्षक संजय वाळवेकर, सहाय्यक अधीक्षक निलोफर शेख, राजेंद्र पाटील, अमोल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रंकाळा तलावात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवल्याबद्दल देवस्थान समितीचे सिक्युरिटी गार्ड उमेश साळोखे आणि सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव शितल इंगवले, इंजिनिअर सुयश पाटील, मिलिंद घेवारी, व्यवस्थापक धनाजी जाधव, राहुल जगताप आदीसह कर्मचारी उपस्थित होते.