…तोपर्यंत आमीर खान स्वत:चा मोबाईल बंद ठेवणार  

0
153

मुंबई (प्रतिनिधी) : बॅालिवूड अभिनेता आमिर खान यांचा महत्त्वकांक्षी असलेला   ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. दरम्यान, आमीर खानने हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमीर स्वत:चा मोबाईल बंद ठेवणार आहे.

आमीर खान त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी अपार कष्ट घेत असल्याची प्रचिती अनेका वेळा आली आहे. त्यामुळेच सिनेसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आमीर त्या भूमिकेत समरस होऊन जातो. त्यासाठीच कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आमीरने मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हॅालिवूडचा ‘फॅारेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक असलेला ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमीरसोबत अभिनेत्री करिना कपूरचीही भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.