टोपच्या उपसरपंचपदी राजू कोळी यांची बिनविरोध निवड…

0
390

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोपच्या उपसरपंचपदी राजू कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इथल्या ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित टोप ग्रामविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. या ठिकाणी उपसरपंच पदावर रोटेशन पध्दतीने सर्वाना संधी देण्यात येणार आहे.

उपसरपंचपदाचा संग्राम लोहार यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. यासाठी आज (सोमवार) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यासी अधिकारी तथा सरपंच रूपाली तावडे  होत्या. यावेळी राजू कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी आघाडीचे नेते तानाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद पाटील, पाडुरंग पाटील, शिवाजी पाटील, बाळासो कोळी, विजय पाटील, श्रीरंग तावडे, संग्राम लोहार, गब्बर पाटील, बाजिराव पोवार, रंजना पाटील, भारती चौगुले, रेखा चौगुले, ग्रामविकास अधिकारी डी. आर देवकाते आदी उपस्थित होते.