हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड…

0
67

कुंभोज (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महाविकास आघाडीच्या अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी पी. डी. मुसळे यांनी केली.

हिंगणगाव येथे ग्रामपंचायतीवर महावीर देसाई अनिल पाटील, अजित पाटील गटाची सत्ता असून पार्टी नियमाप्रमाणे सर्वांना समान संधी देण्याचा निर्णय निवडणूक कालावधीमध्ये झाला होता. त्या अनुषंगाने विद्यमान उपसरपंच स्वप्नील पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच शीला पाटील यांच्याकडे सुपूर्द केला होता. हा राजीनामा ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. यावेळी उपसरपंच पदासाठी महाविकास आघाडीकडून अर्चना पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी पी. डी. मुसळे यांनी उपसरपंच पदी शिल्पा पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

यावेळी अभिजीत मुळे, पुष्पा खांबे, उत्तम माने, सुवर्णा कांबळे, अश्विनी जमादार ,ताजुद्दीन नायकवडी, पूजा देसाई उपस्थित होत्या.