नागांवच्या उपसरपंचपदी अनिल कांबळे यांची बिनविरोध निवड

0
418

टोप (प्रतिनिधी) नागांव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल भाऊसो कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच अरूण माळी होते. तर आघाडीचे नेते डॉ. गुंडा सावंत, सुनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागांव ग्रामपंचायतीवर विकास आघाडीची सत्ता असून रोटेशन पद्धतीने ठरल्या प्रमाणे उपसरपंच मनिषा संतोष पाथरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झाल्या पदासाठी अनिल कांबळे यांचा एकमेव अर्ज अल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भीमराव खाडे, राजाराम वडार, भिकाजी सावंत, सुनिता पोवार, सरिता माळी, मनिषा पाथरे, राजेंद्र यादव, आघाडीचे नेते दिपक लंबे, विजय पाटील, सतिश लंबे, सुनिल सुतार, अनिल शिंदे, अप्पासो शर्मा, संपत कांबळे, दाविद कांबळे, स्वप्नील डांगे, आदी उपस्थित होते.