कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कांडगाव-हळदी इथल्या मुख्य चौकात ट्रॅक्टरवर साऊंडचे बाँक्स लावून स्त्रियांना नाचवणे तसेच बेकायदेशीररित्या ५० ते ६० लोकांची गर्दी करून विनापरवानगी मिरवणूक काल (गुरुवार) काढली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० जणांवर करवीर पोलीस ठाण्यात आज (शुक्रवार) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस पाटील राहूल भिमराव पाटील (वय ३७, रा. कांडगाव) यांनी दिली आहे. यामध्ये विनायक शिंदे, अजित शिंदे, संदीप घोसरवाडे, सचिन घोसरवाडे, शिवम पाटील, विजय नाईक, बाबासो चव्हाण, बाजीराव मिसाळ हे सर्व (रा. कांडगाव) आणि कृष्णात बुडके, कृष्णात पाटील (रा. वाशी ता.करवीर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल सार्वजनिक रस्त्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ट्रॅक्टरवर साऊंड लावला होता. तसेच यावेळी स्त्रियांना नाचवून बेकायदेशीररित्या ५० ते ६० लोकांची गर्दी केली होती. सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना मिरवणूक काढली. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.