कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर – राधानगरी रोडवरील पुईखडी परिसरात संकल्पसिद्धी कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री बेकायदेशीर विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली. यशवंत ज्ञानदेव कांबळे (वय ३६, रा. राजेंद्रनगर कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून टेम्पोसह देशीविदेशी मद्याचा साठा असा ७ लाख १ हजार ५५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

तर याप्रकरणी संशयित आरोपी यशवंत कांबळेसह रोहित बाईन्स शॉप लक्ष्मीपुरी आणि रामकृष्ण परमिट रूम परिते (ता. करवीर) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मीपुरी येथील रोहित वाईन्समधून बेकायदेशीर विनापरवाना लाखोंचा मद्यसाठा घेऊन चालक यशवंत कांबळे हा (एमएच ०९ एफएल १३६३) टेम्पोमधून रामकृष्ण परमिट रुम परिते येथे पोहोच करण्यासाठी  जात होता. दरम्यान पुईखडी परिसरात संकल्पसिद्धी कार्यालयासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीर दारू वाहतूक करताना कांबळे याला ताब्यात घेतले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टकले,  सहाय्यक फौजदार शिवाजी जामदार, चंदू ननवरे,  पो. काँ. गुलाबराव चौगुले, विलास किरोळकर, नामदेव यादव, अनिल पास्ते यांनी केली.