इचलकरंजीत जबरी चोरी : पाच तोळे दागिने लंपास

0
76

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील भोने मळा परिसरात आज (गुरुवार) दुपारी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरामध्ये घुसून जबरी चोरी करण्यात आली. घरातील विमल पाटील यांचे कपड्याने हात-पाय बांधून मारहाण करून त्यांच्या अंगावरील पाच तोळे दागिने लंपास करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे दिसत आहेत. 

या प्रकरणी दोन चोरट्यांविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी विमल पाटील यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.