कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजाराम बंधारा येथे गणपत जाधव यांच्या शेताजवळ आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास अंदाजे ६० वर्षे वयाच्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत उमेश राजाराम नांगरे (रा. वडणगे) यांनी करवीर पोलीस ठाण्यात वर्दी दाखल केली असून अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत.