शहरातील प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क हाती घ्या : महापौर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील प्रमुख रस्ते आणि वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यांचे पॅचवर्क तात्काळ करण्याचे महापालिकेचे नियोज आहे. यासाठी रस्ते आणि पॅचवर्क स्पॉट निश्चित करुन काम युध्दपातळीवर हाती घ्या, अशी सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी केली.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या सुचनेनुसार शहरातील प्रमुख्य रस्त्यांचे पॅचवर्क दिवाळीपुर्वी पुर्ण होण्याच्या दृष्टीने महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, शहर अभियंता वसर्व उपशहर अभियंता यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारगंधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप  सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता भास्कर कुंभार आदी उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या की, शहरातील प्रमुख रस्त्यांची पॅचवर्कची कामे दिवाळीपुर्वी पुर्ण करुन रस्ते चकाचक करण्याचा महापालिकेचा निर्धार आहे. रस्त्यांचे पॅचवर्क करताना प्रमुख रस्ते आणि वर्दळीचे रस्त्यांवर पडलेले खड्डे प्राधान्य क्रमाने मुजविणे गरजेचे आहे. यासाठी शहर अभियंता आणि उपशहर अभियंता यांनी आजच पॅचवर्कची ठिकाणे निश्चित करुन तसा अहवाल द्यावा. याकामास सर्वोच्च प्राधान्य देण्याची सुचनही त्यांनी केली.

स्थायी समिती सभापती सचिन पाटील म्हणाले, पॅचवर्कसाठी स्पॉट निश्चित करताना बारकाईने अभ्यास करुन अतिशय गरजेच्या असणाऱ्या प्रमुखरस्त्यावरील स्पॉट निश्चित करावेत. मंजूर ५० कोटींची रस्ते सोडून इतर रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी सर्व उपशहर अभियंत्यांनी पॅचवर्कच्या ठिकाणे आजच निश्चित करुन हे काम सर्वोच्च प्राधान्य क्रमाने हाती घ्यावे अशी सुचना केली.

यावेळी उपशहर अभियंता एन.एस.पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, माजी नगरसेवक विनायक फाळके, आश्पाक आजरेकरआदी उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

कोरोना अपडेट : दिवसभरात २२१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

8 hours ago