नवी दिल्ली (प्रतिनिधी) : यूआयडीआयने आता आधार कार्डचे स्वरूप बदलले आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पीव्हीसी कार्ड देण्यात येणार आहे. एटीएम प्रमाणे दिसणारे कार्ड मिळणार आहे. हे पन्नास रुपयांत ऑनलाइन मागवता येणार आहे. ऑर्डर केल्यानंतर पाच दिवसांत कार्ड घरपोच मिळणार आहे. यासंबंधी यूआयडीएआयने ट्विटरवर माहिती दिली आहे.

नवीन पीव्हीसी आधार कार्डसाठी यूआयडीआयच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्या ठिकाणी माय आधारमध्ये जावून ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करावे. याठिकाणी बाराअंकी आधार कार्ड क्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्यूअल आयडी किंवा २८ अंकी आधार एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल. सिक्योरिटी कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करावे.  तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी एंटर करावे. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्डाचा प्रीव्ह्यू दिसेल. पेमेंट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला ५० रुपये फी भरावी लागणार आहे.

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आधार पीव्हीसी कार्डाची प्रोसेस पूर्ण होईल. पाच दिवसांमध्ये पीव्हीसी आधार कार्ड मिळणार आहे. यूआयडीआय डिपार्टमेंटकडून भारतीय डाक विभागाकडे कार्ड पाठवले जाईल. पोस्टाच्या माध्यमातून कार्ड तुमच्या घरी पोहोचवले जाणार आहे.