उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची हौस फिटली : चित्रा वाघ

0
13

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची हौस फिटली असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, त्यांना जर महिला मुख्यमंत्री बसवायचे असेल, तर चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्रीपदावर कुणीही बसले तरी सद्सदविवेक बुद्धीने काम करावे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात महिलांवर किती अत्याचार झाले? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे. संजय राठोड यांना त्यांच्याच सरकारने क्लीन चिट दिली होती, पण माझी लढाई सुरूच राहील, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.