…तर उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना फाडून खाल्लं असतं : चित्रा वाघ   

0
209

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड बलात्कारी असून  त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्याभिचाराचं उदात्तीकरण सुरू आहे. पण, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख असते,  तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं,  असे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.  त्या  नाशिक येथे आज (शनिवार) पत्रकार परिषदेत बोलत होत्या.  

त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी बसला आहे. षंढासारखं बसून राहणार हे सरकार नामर्द आहे. पण मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा आहे. मला अपेक्षा आहेत. आम्ही सातत्याने बोलतोय पण, साधा एफआयआर होत नाही. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं खुर्चीत बसल्यावर एवढी वाईट परिस्थिती होते का? आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं, असे  त्या म्हणाल्या.