मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या  टॉप फाईव्ह यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी     यांना स्थान मिळाले आहे. तर पहिल्या  दहांमध्ये भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री आहे.  ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केवळ भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांना स्थान मिळाले आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिले स्थान  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन तिसऱ्या क्रमांकावर तर  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही स्थान मिळाले आहे.  या यादीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा  समावेश आहे. योगींना या सर्व्हेत केवळ २९  टक्के लोकांनी पसंती दिली आहे.